Ad will apear here
Next
‘आविष्कार’च्या वस्तू एक नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध
आविष्कार संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाशकंदील.

रत्नागिरी : दर वर्षीप्रमाणे याही वर्षी आविष्कार संस्थेच्या श्री. शामराव भिडे कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या, आकाशकंदील आदी वस्तूंची स्टॉलच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ जयगड येथील जेएसडब्ल्यू एनर्जी येथे, तर एक ते चार नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत रत्नागिरी शहरातील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

वस्तू तयार करताना विद्यार्थीयेथील आविष्कार संस्थेत १९ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या अध्यक्षा नीला पालकर आणि कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी माहिती दिली. अविष्कार संस्था गेली ३२ वर्षे मतिमंदांच्या विकासासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून सौ. सविता कामत विद्यामंदिर, श्री. शामराव भिडे कार्यशाळा, वर्षा चोक्सी बालमार्गदर्शन केंद्र, कै. प्रताप मंगेश कानविंदे शीघ्र उपचार केंद्र, आविष्कार उत्पादन केंद्र असे उपक्रम राबविले जातात.

अधिक माहिती पालकर म्हणाल्या, ‘कार्यशाळेमध्ये व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये खास दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार करून त्याची विक्री केली जाते. विद्याथी स्टॉलच्या माध्यमातून स्वतः निर्मिती केलेल्या वस्तूंची विक्री करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची पुढील कौशल्ये विकसित होण्यास मदत होते. कार्यशाळेच्या कार्याची दाखल घेत जयगड येथील जेएसडब्ल्यू एनर्जी गेली सहा वर्षे आपल्या आवारामध्ये या विद्यार्थ्यांच्या वस्तूंचे स्टॉल लावत आहे. गेली तीन वर्षे भारत पेट्रोलियमच्या माध्यामतून नितीन विचारे पणत्या-मेणबत्त्या मोठ्या प्रमाणात खरेदी करून सहकार्य करत आहेत.’

‘पुणे येथील लक्ष्य फाउंडेशन यांच्याकडून या वर्षी दिवाळीसाठी उपयुक्त वस्तूंची ऑर्डर मिळाली आहे. आविष्कारचे हितचिंतक अशोक कुलकर्णी यांच्याकडून सुगंधित चाफ्याच्या फुलांची मोठ्या प्रमाणवर ऑर्डर मिळाली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षणातून निर्माण होणाऱ्या वस्तूंची विक्री करून मिळणारा ६० टक्के नफा विद्यार्थ्यांना विभागून दिला जातो,’ असे पालकर यांनी सांगितले.



कार्यशाळेचे अधीक्षक वायंगणकर म्हणाले, ‘प्रौढ दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शामराव भिडे कार्यशाळा गेली २६ वर्षे कार्यरत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करण्यात कार्यशाळेला यश आले आहे. आज सुमारे ३७ विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन होऊन ते आपल्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावत आहेत. सध्या कार्यशाळेत स्टेशनरी मेकिंग, शिवण, क्राफ्ट, गृहशास्त्र, प्राथमिक सुतारकाम, मेणबत्ती, ज्वेलरी असे विभाग कार्यरत आहेत.’



‘विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या स्टॉलला भेट देऊन आणि वस्तूंची खरेदी करून त्यांच्या जिद्दीला हातभार लावाला,’ असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा पालकर, सचिव डॉ. उमा बिडीकर, शामराव भिडे कार्यशाळा समिती अध्यक्ष नितीन कानविंदे आणि व्यवस्थापकीय अधीक्षक वायंगणकर यांनी केले आहे.

(सोबत व्हिडिओ देत आहोत)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZOKBT
Similar Posts
भिडे कार्यशाळेत ‘पाणी वाचवा’ संदेश देत रंगोत्सव साजरा रत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेमध्ये दर वर्षी शिमगोत्सव आणि रंगोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जातो. या वर्षीही ‘पाणी वाचवा’ असा संदेश देत रंगपंचमी साजरी करण्यात आली.
विशेष मुलांनी घडविले गणेशरूपांचे ‘आविष्कार’ रत्नागिरी : रत्नागिरीतील आविष्कार संस्थेतील विशेष मुलांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने विविध प्रकारच्या साहित्यातून गणेशरूपे साकारली आणि पर्यावरणपूरक व कलात्मक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. त्यांच्या हातून घडलेल्या आविष्कारांचे प्रदर्शन पाहणारे थक्क होत होते.
श्यामराव भिडे कार्यशाळेत दिव्यांग दिन उत्साहात रत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘क्षण रंगलेले’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.
भिडे कार्यशाळेत हर्षयामिनी निवास प्रकल्पाचे आयोजन रत्नागिरी : आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेत हर्षयामिनी हा निवास प्रकल्प राबविण्यात आला. यात ‘जादू की दुनिया मॅजिका’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जादूगार विनयराज उपरकर यांनी आपल्या जादुई कौशल्याने कार्यशाळेचे विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांवर जादू केली. विद्यार्थ्यांनी चांदण्या रात्री सहभोजनाचा आस्वाद घेतला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language